Akurdi : श्रीरंग बारणे यांचा आकुर्डीत उद्या जाहीर नागरी सत्कार

एमपीसी न्यूज – शिवसेना आणि श्रीरंग आप्पा बारणे मित्र परिवारातर्फे मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांचा उद्या (रविवारी) जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

आकुर्डीतील सिझन बँन्कविट येथील सभागृहात रविवारी सायंकाळी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते मधु जोशी, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, ज्येष्ठ कामगार नेते मनोहर भिसे यांच्या उपस्थितीत लोकसभेत सलग दुस-यावेळी निवडून आल्यानिमित्त खासदार श्रीरंग बारणे यांचा सत्कार केला जाणार आहे.

  • या जाहीर नागरी सत्कार सोहळ्याला शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या संयोजनात जिल्हाप्रमुख गजानन चिंचवड, जिल्हा संघटिका शादान चौधरी, शहरप्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका उर्मिला काळभोर, तालुका प्रमुख राजू खांडभोर, पिंपरी विधानसभा प्रमुख नगरसेवक प्रमोद कुटे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, विधानसभा संघटिका सरिता साने, अनिता तुतारे, शैला खंडागळे, राजेश वाबळे, बशीर सुतार, धनाजी बारणे यांनी पुढाकार घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.