Akurdi News : प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात भरली 24 वी आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषद

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात (Akurdi News) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रशियातील मॉस्को येथील ब्रिक्स वर्ड ऑफ ट्रॅडिशन, पुणे येथील स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूट आणि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 24 व्या आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषद नुकतीच पार पडली.

ब्रिक्स वर्ल्ड ऑफ ट्रॅडिशनलच्या अध्यक्ष डॉ. लुडमीला सेकाचेवास्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष डॉ. स्नेहल तावरेडॉ.  लालसिंह तावरेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकरकौन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन, फिनलँडच्या शिरीन कुलकर्णी, इंडो-जपान बिझनेस कौन्सिलचे अध्यक्ष अभिषेक चौधरी तसेच लोकसंपर्क अधिकारी शेफाली तिवारी, उपप्राचार्य बेजमी  लोबो, उपप्राचार्य डॉ. हिरालाल सोनवणे, इंग्लिश विभागाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. मंजुषा धुमाळपरिषदेच्या समन्वयक प्रा. डॉ. शिल्पागौरी गणपुले इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला (Akurdi News) उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रशिया आणि भारत यांच्या मैत्रीपूर्ण  संबंधांचे प्रतीक म्हणून दोन्ही देशांच्या ध्वजाच्या रंगाचे फुगे टाळ्यांच्या कडकडाटात आकाशात सोडण्यात आले.

भारताचे राष्ट्रपिता आदरणीय महात्मा गांधी, रशियाचे जगद्विख्यात लेखक लिओ टॉलस्टॉय यांचा शांतीचा संदेश जगभर पोहोचविण्याचा संकल्प ब्रिक्स या सेवाभावी संस्थेने केलेला आहे. रशिया आणि भारत यांच्यामध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण नातेसंबंध जोपासणे हे ब्रिक्स चे खरे कार्य आहे,” असे प्रतिपादन डॉ. लुडमीला सेकाचेवा यांनी केले.

डॉ. लुडमीला यांच्यासमवेत दमित्री कुर्बातोव, अनस्तासिया शिकीटिनादमित्री चिगलींत्सेव आणि राहुल शर्मा हे ब्रिक्सच्या शिष्टमंडळातील इतर सदस्य आवर्जून उपस्थित  होते.

या प्रसंगी “काँट्रीब्युशन ऑफ टीचर, फिलॉसॉफर ऑर टीचर इन माय लाईफ” आणि प्रा. डॉ. शिल्पागौरी गणपुले यांनी संपादित केलेल्या  “फिलोफिली” आणि “छत्र मायेचे” ह्या पुस्तकांचे प्रकाशन (Akurdi News) करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सदैव वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करत असते. या आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेच्या  आयोजनामुळे विद्यार्थ्यांना  वेगवेगळ्या देशातील तज्ज्ञांचे विचार ऐकण्याची अनमोल संधी प्राप्त झाली. या परिषदेमधील विचारमंथना मुळे विद्यार्थी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विचार करण्यास उद्युक्त झाले. ब्रिक्स रशिया आणि महाविद्यालय  यांच्यातील सहकार्य कराराचा भाग म्हणून महाविद्यालयात  विद्यार्थ्यांना रशियन भाषा  शिकण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे,” असे विचार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकर यांनी मांडले.

Maths Day : स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात

पाहुण्यांचे स्वागत प्रा. डॉ. शिल्पागौरी गणपुले यांनी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्नेहल तावरे यांनी, आभार प्रदर्शन प्रा.  डॉ.  मंजुषा धुमाळ यांनी आणि  रेणुका सिंग यांनी  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी (Akurdi News) इंग्लिश विभागाच्या  डॉ. आशुतोष ठाकरेप्रा सुप्रिया कुलकर्णीप्रा पांडुरंग समिंदर, प्रा हर्षल गांगुर्डे, प्रा परवेज शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमास उस्फूर्तपणे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने संपन्न करणारी बौद्धिक मेजवानी या परिषदेद्वारे लाभली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.