Akurdi News : अस्तित्व फांऊडेशनच्या वतीने 2 ऑक्टोबरला शहरात भव्य रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – अस्तित्व फाऊंडेशनच्या वतीने 2 ऑक्टोबरला पिंपरी चिंचवड शहरात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. फांऊडेशनच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान आयोजित केले आहे. शिबिरात एक हजार युनिटस् रक्त संकलित करण्याचा संकल्प फाऊंडेशनने केला आहे.

खंडोबा देवस्थान सांस्कृतिक हॉल, आकुर्डी चौक याठिकाणी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या रक्तदान शिबीरात सहभागी होता येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा आहे तसेच कोरोनामुळे रक्तदान करण्याचे प्रमाण कमी झाले असल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात एक हजार युनिटस् रक्त संकलित करण्याचा अस्तित्व फाऊंडेशननचा मानस आहे.

अस्तित्व फांऊडेशन मागील पाच वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. यामध्ये वारकऱ्यांसाठी औषध वाटप, आरोग्य तपासणी, कोरोना काळात बारा हजार अन्नधान्य किट वाटप, केरळ पूरग्रस्तांना मदत, प्लाझ्मा दान, पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत, गड संवर्धन उपक्रम, शालेय विद्यार्थ्यांना नेतृत्व कौशल्य शिकवणे, महिलांचा गुणगौरव, चिपळूण- महाड पूरग्रस्तांना मदत, शतावरी आणि बेबी किट वाटप असे अनेक उपक्रम अस्तित्व फांऊडेशनच्या वतीने राबविले जातात.

दोन ऑक्टोबरला होणाऱ्या शिबिरात सहभागी होण्यासाठी अस्तित्व फांऊडेशनच्या वतीने व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करण्याचे  https://chat.whatsapp.com/DdpkS5ZkodE9bn8IUjnauH  तसेच अधिक माहितीसाठी 7720001488 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.