Akurdi News: आकुर्डी रुग्णालयाचे ‘कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल’असे नामकरण

महासभेची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आकुर्डीमध्ये नवीन 100 बेडचे अद्ययावत रुग्णालय तयार झाले आहे. या रुग्णालयास ‘ कै. ह. भ. प. प्रभाकर मल्हारी कुटे मेमोरियल हॉस्पिटल’ असे नाव देण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला उपसूचनेद्वारे आज (मंगळवारी) महासभेत मान्यता देण्यात आली.

प्रभाकर कुटे हे आकुर्डी येथील प्राचीन विठ्ठल मंदिराचे विश्वस्त होते. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ते सेवेकरी होते. त्यांचे वडील कै. मल्हारी कुटे आकुर्डी गावचे माजी उपसरपंच होते. विद्यमान नगरसेवक प्रमोद कुटे यांचे वडील तर माजी नगरसेविका चारुशीला कुटे यांचे पती होते.

गेल्या चार दशकापासून ते सामाजिक,अध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यामध्ये कार्यरत होते. विठ्ठलवाडी-आकुर्डी गावच्या विकासामध्ये त्यांचा सहभाग होता. मनमिळाऊ दानशूर व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. त्यांचे नुकतेच निधन झाले आहे.

महापालिकेच्या वतीने आकुर्डीमध्ये नवीन 100 बेडचे अद्ययावत रुग्णालय तयार झाले आहे. त्याचे काम पूर्ण झाले आहे.

या रुग्णालयास कै.ह.भ.प प्रभाकर मल्हारी कुटे मेमोरियल हॉस्पिटल असे नाव देण्याची उपसूचना भाजपच्या मोरेश्वर शेडगे यांनी मांडली. त्याला उपमहापौर तुषार हिंगे यांनी मान्यता दिली. एकमताने ही उपसूचना मंजूर करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.