Akurdi News : आकुर्डीत शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज – महात्मा गांधी जयंती आणि अस्तित्व फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी (दि. 2) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्रिमूर्ती हॉल, म्हाळसाकांत चौक, आकुर्डी येथे सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन या कालावधीत हे रक्तदान शिबीर होणार आहे.

सामाजिक कार्याच्या उद्देशाने सुरु केलेली अस्तित्व फौंडेशन ही सामाजिक संस्था आपला चौथा वर्धापन दिन साजरा करत आहे. “अस्मितेतून अस्तित्वाकडे” या भावनेतून विविध सामाजिक कार्यामध्ये कायम पुढाकार घेत आपल्या स्थापनेची चार वर्षे संस्थेने पूर्ण केली आहेत.

_MPC_DIR_MPU_II

सध्या कोरोना महामारीमुळे रक्ताची मागणी वाढत असताना सामान्य नागरिकांना रक्तदान करणे अवघड झाले आहे. त्यामुळे रक्तदात्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेत, फिजिकल डिस्टंसिंग व इतर सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोर पालन करत हे रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे.

या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन अस्तित्व फौंडेशनचे उपाध्यक्ष सुरज बनसोडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.