Akurdi News : अकुर्डीतील रक्तदान शिबिरात 235 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज – नगरसेवक प्रमोद कुटे युवा मंच आणि सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सुमारे 235 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.

महाराष्ट्र दिनानिमित्त आकुर्डीतील श्री विठ्ठल मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिर पार पडले. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्याध्यक्ष रवी नामदे, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर देशमुख, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष श्रमिक गजमुंडे उपस्थित होते.

शिबिराचे आयोजक नगरसेवक प्रमोद कुटे म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारने 18 वर्षापुढील सर्वांनाच मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतल्यानंतर किमान 28 दिवस रक्तदान करता येत नसल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेने यापूर्वीच जाहीर केले आहे. शहरात सध्या रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रक्त संकलन होणे गरजेचे आहे. त्यासाठी लसीचा डोस घेण्यापूर्वी जास्तीतजास्त नागरिकांनी रक्तदान करावे. जेणेकरून कोविड काळात रक्ताची टंचाई भासणार नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.