Akurdi News : आकुर्डीतील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी

एमपीसीन्यूज : आकुर्डी येथे मशिद आणि चर्च जवळील रस्ता सहा महिन्यांपूर्वी खोदून ठेण्यात आला आहे. त्यामुळे या धार्मिक स्थळांमध्ये प्रार्थनेसाठी जाणाऱ्या भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार शिवसेना पिंपरी चिंचवड शहर कार्यालयप्रमुख बशीर सुतार यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन पाठविले आहे. महापालिकेच्या वतीने सहा महिन्यांपूर्वी आकुर्डी येथील मशिद आणि चर्चच्या परिसरात विकासकामांसाठी रस्त्यांची खोदाई करण्यात आली होती.

मात्र, सहा महिने उलटून गेले तरी अद्यापही या रस्त्यांची डागडुजी केलेली नाही. परिणामी या भागातील नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ज्या ठिकाणी रस्त्यांची खोदाई करण्यात आलेली आहे. त्या परिसरात मशिद आणि चर्च आहे. तेथे नियमित प्रार्थना करण्यासाठी भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

महापालिका प्रशासनाने तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, अशी मागणी सुतार यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.