Akurdi News: युवा सेनेकडून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे जोरदार स्वागत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर दौऱ्यावर आलेले पर्यटन, पर्यावरण, वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे युवा सेनेने जोरदार स्वागत केले. युवा सेना अधिकारी विश्वजित बारणे यांनी मंत्री ठाकरे यांचे स्वागत केले.

आकुर्डीत स्वागत मंडप उभारला होता. पिंपरी-चिंचवड शहर युवा सेना अधिकारी विश्वजित बारणे यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांचा जगद्गगुरु संत तुकाराम महाराज यांची मूर्ती भेट देऊन सत्कार केला. पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना संपर्कप्रमुख, माजी मंत्री सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर, अजिंक्य उबाळे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री ठाकरे आज (बुधवारी) पिंपरी-चिंचवड शहराच्या दौ-यावर आले होते. चिंचवड एमआयडीसी येथील कायनेटीक ग्रीन एनर्जी अ‍ॅण्ड पॉवर सोल्युशन आणि टाटा मोटर्स कंपनीला त्यांनी भेट दिली. तत्पूर्वी, युवा सेनेच्या वतीने आदित्य ठाकरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. युवा सेनेकडून वातावरणनिर्मिती केली. भक्ती-शक्ती पुलाच्या सुरुवातीला स्वागत कमान उभारली होती. आदित्य ठाकरे यांच्या शहर दौऱ्यामुळे युवा सेनेत उत्साह पाहायला मिळाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.