Akurdi News: राज ठाकरे यांच्या विचारांचा मळवट भरा अन हातात हात घालून काम करा – गणेश सातपुते

आकुर्डीतील मेळाव्यात तीनशे जणांचा मनसेत प्रवेश; शंभर शाखाध्यक्षांच्या नियुक्त्या

एमपीसी न्यूज – आज विस्थापितांना केवळ मनसेत भविष्य आहे. जिथं अन्याय होईल तिथं खळखट्याकची भूमिका घेणारा पक्ष म्हणून लोकं राजसाहेबांकडे पाहतात. कारण लोकांना माहित आहे न्याय मिळतो तो फक्त राजसाहेबांच्या कृष्णकुंजवरच. इथली भाजप आणि राष्ट्रवादी प्रस्थापित आहे. ‘पैसे वाट आणि निवडून ये’ अशी त्यांची भूमिका. आपणं मात्र विस्थापित आहोत, असे समजून राजसाहेबांच्या विचारांचा मळवट भरा अनं हातात हात घालून काम करा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्याचे उपाध्यक्ष गणेश सातपुते यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आकुर्डीतील खंडोबा माळ येथील प्रांगणात भव्य पक्षप्रवेश, नवनियुक्तांना पदवाटप आणि पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी सातपुते बोलत होते.

व्यासपीठावर मनसेचे राज्याचे नेते अनिल शिदोरे, मनसे नेते राजेंद्र  वागस्कर, राज्याचे सरचिटणीस किशोर शिंदे,  रणजितदादा शिरोळे, मनसे शहराध्यक्ष तथा गटनेता सचिन चिखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

रणजीत शिरोळे म्हणाले, गत 2017 च्या पालिका निवडणुकीत अनेकजण पुढे आले. तिकिटं घेतली निवडणुक लढले. त्यानंतर गायब झाले. त्यानंतर पुढील पाच वर्ष त्यांनी काय केले? तेच जाणोत. केवळ सोशल मीडियावर चमकोगिरी करू नका. कामात सातत्य ठेवा. पालिकेच्या 128 नगरसेवकांच्या प्रभागातील नागरिकांपर्यंत पोहोचा. केवळ गाजावाजा करू नका, आताचे नागरिक हुशार आहेत. काम दाखवा. मग त्या प्रभागाचे पुढील नगरसेवक तुम्हीच असाल.

किशोर शिंदे म्हणाले, राजसाहेब ठाकरे यांनी मनसेत कात टाकली आहे. आज त्यांच्यामुळे मनसैनिकांना सन्मान मिळतोय. ते कार्यकर्त्याच्या चेहऱ्याकडे नव्हे तर तळाकडे पाहतात. त्यांच्या दृष्टीने शाखा अध्यक्षांचे काम पक्षाला तारक ठरते. त्याला साजेशी अशी ‘राजदूत’ ही नवीन संकल्पना त्यांनी पक्षात रुजू केली आहे. शाखा अध्यक्षांमुळेच मुंबईत नगरसेवक होता येतं. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरावर मनसेचा झेंडा लागला पाहिजे. आपलं संख्याबळ कमी आहे असं समजू नका. सचिन चिखले हे पिंपरी-चिंचवड मनसेचा चेहरा आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली तयार व्हा. अजून बरीच लोकं पक्षात प्रवेश करणार आहेत. सध्या आपला नारा ‘एकला चलो रे’ चाच आहे. पालिका निवडणुकीसाठी युती की आघाडी याचा निर्णय राजसाहेबांचा. तिकीट वाटपात पक्षातील लोकांनाच प्राधान्य असणार. पक्षातील लढण्याची आणि जिंकण्याची ताकद असणाऱ्या इच्छुकांनी आजच गुलालाचा ट्रक घेऊन जावा. कारण राजसाहेबांचे विचार पटणारा कार्यकर्ता नक्कीच नगरसेवक होणार यात तिळमात्र शंका नाही.

सचिन चिखले म्हणाले, कोणतेही पद नसताना राजसाहेबांच्या मनसैनिकांनी अन्यायाला वाचा फोडण्याच्या कार्यात पुढाकार घेतलाय. कोरोना कार्यातही हातभार लावला. शहरात मनसेचे स्वतःचे पक्ष कार्यालय नव्हते ते आता उभे रहात आहे. त्याचे उद्घाटन राजसाहेबांच्या हस्ते येत्या महिन्यात होईल. कोरोना कालावधीत पक्ष विस्तारासाठी शासनाच्या नियमावलीचे पालन करीत मनसैनिक व पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीद्वारे संवाद साधला. बैठकीत शाखा अध्यक्षांच्या नियुक्तींची मागणी जोर धरत होती. त्यानुसार मेळाव्यात शाखा अध्यक्षांच्या नियुक्त्या करीत त्यांना जबाबदारीचे वाटप केले आहे. लवकरच मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते शहरात प्रभागनिहाय शाखांचे उद्घाटन होईल. शाखा अध्यक्षांनी आपल्या कामाच्या जोरावर प्रभागात झंझावात निर्माण करावा. पुढील पाच महिन्यावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आताच फुटला, असे समजून कामाला लागा.  पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन आकडी संख्या गाठण्यासाठी सज्ज व्हा, आत्मविश्वास बाळगा.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरातील तीनशे जणांनी राजसाहेबांच्या विचारसरणीला अंगीकारून मनसेत प्रवेश केला. त्यांचे पदाधिकाऱ्यांनी जंगी स्वागत केले. शिवाय 100 जणांची शाखा अध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी शहर मनसेचे रूपेश पटेकर (सचिव, मनसे पिं.चिं.), मयुर चिंचवडे (विभाग अध्यक्ष, मनसे चिंचवड), राजु सावळे ( उपाध्यक्ष, मनसे पिं.चिं.), विशाल मानकरी (उपाध्यक्ष, मनसे पिं.चिं.), मयूर चिंचवडे (विभाग अध्यक्ष, चिंचवड विधानसभा), दत्ता देवतरसे (विभाग अध्यक्ष, पिंपरी विधानसभा), अंकुश आप्पा तापकीर (विभाग अध्यक्ष मनसे भोसरी विधानसभा), बाळा दानवले (उपाध्यक्ष मनसे पिं.चिं.) आणि महिला सेनेचे पदाधिकारी अश्विनी बांगर महिला अध्यक्ष , सिमा बेलापुरकर , अनिता पांचाळ, सगिता देशमुख , विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष  हेमंत डागे , जनहित विधी कक्ष राजु भालेराव व प्रती ताई हे उपस्थित होते व चित्रपट सेनेचे मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभानिहाय शाखा अध्यक्षांची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे!

पिंपरी विधानसभा :-
प्रभाग क्रमांक 10 :- सुरेश देवासे – शाखा अध्यक्ष, योगेश बलाटे – शाखा अध्यक्ष, विशाल उकिरडे – शाखा अध्यक्ष,
प्रभाग क्रमांक 14 :- के. के. लांबडे – संघटक, तुषार तेवळे – शाखा अध्यक्ष, प्रथमेश कुंभार – शाखा अध्यक्ष, शुभम सोनुरे – शाखा अध्यक्ष,
प्रभाग क्रमांक 15 :- भागवत नागपुरे – शाखा अध्यक्ष, प्रसाद मराठे – शाखा अध्यक्ष,
प्रभाग क्रमांक 19 :- सागर शिंदे – शाखा अध्यक्ष, सचिन जमदाडे – शाखा अध्यक्ष,
प्रभाग क्रमांक 20 :- कृष्णा बिकणगीकर – उपविभाग, काशिनाथ खनुरकर – शाखा अध्यक्ष,
प्रभाग क्रमांक 21 :- रोहित सुनील येरकुंडे – शाखा अध्यक्ष, अक्षय दशरथ सोरडे – शाखा अध्यक्ष,
प्रभाग क्रमांक 30 :- सागर भोकरे – शाखा अध्यक्ष, शैलेश दीक्षित – शाखा अध्यक्ष.

चिंचवड विधानसभा :-
प्रभाग क्रमांक 17 :- सचिन शिंगाडे – माथाडी अध्यक्ष, विनोद भंडारी – संघटक,
प्रभाग क्रमांक 31 :- अनिकेत बलकवडे – शाखा अध्यक्ष, शुभम यशवंत शिंदे – शाखा अध्यक्ष, अंकित कुलकर्णी – शाखा अध्यक्ष,
प्रभाग क्रमांक 32 :- गणेश माने – शाखा अध्यक्ष, साईराज भोसले – शाखा अध्यक्ष,
प्रभाग क्रमांक 17 :- आदित्य भलारे – उप विभाग विद्यार्थी सेना,
प्रभाग क्रमांक 27:- गणेश गायकवाड – शाखा अध्यक्ष,
प्रभाग क्रमांक 22 :- अमित डेरवणकर- शाखा अध्यक्ष, सुरज भोइटे – शाखा अध्यक्ष.

भोसरी विधानसभा :-
प्रभाग क्रमांक 6 :- दिगंबर गुंजाळ – उपविभाग अध्यक्ष, शंकर तरपडे – शाखा अध्यक्ष, अजय पाटोळे – शाखा अध्यक्ष,
प्रभाग क्रमांक 7 :- अंकित शिंदे – शाखा अध्यक्ष, पुनित गळितकर – शहर संघटक,
प्रभाग क्रमांक 8:- विशाखा माळी – शाखा अध्यक्ष,
प्रभाग क्रमांक 13 जेकब मॅथ्यु – शाखा अध्यक्ष, स्वप्नील महागडे – शाखा अध्यक्ष, मनोज लांडगे – सचिव,
प्रभाग क्रमांक 12 :- सुरज गणेश जाधव – शाखा अध्यक्ष,
प्रभाग क्रमांक 1 :- कौस्तुभ देशमुख,
प्रभाग क्रमांक 2 :- रवी जाधव – शाखा अध्यक्ष,
प्रभाग क्रमांक 3 :- आकाश मोहिते – शाखा अध्यक्ष, शुभम आल्हाट – शाखा अध्यक्ष, संतोष महाजन – उपशाखा अध्यक्ष, अमित पवार – उपशाखा अध्यक्ष,
प्रभाग क्रमांक 4 :- आकाश ओव्हाळ – शाखा अध्यक्ष,
प्रभाग क्रमांक 5 :- तुषार सोनटक्के – उपविभाग अध्यक्ष, अक्षय देसले – शाखा अध्यक्ष,
प्रभाग क्रमांक 18 :- उमेश उकांडे – शाखा अध्यक्ष,
प्रभाग क्रमांक 25 :-आकाश झेंडे – शाखा अध्यक्ष, भरत चव्हाण – शाखा अध्यक्ष, प्रशांत वाघोले – शाखा अध्यक्ष, निलेश जाधव – शाखा अध्यक्ष, आकाश दिनेश झेंडे – शाखा अध्यक्ष,
प्रभाग क्रमांक 24 :- संदेश सोनवणे – शाखा अध्यक्ष.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.