Akurdi News: माजी नगरसेविका चारुशीला कुटे यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका चारुशीला प्रभाकर कुटे यांचे आज (शनिवारी) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 54 होते. शिवसेना नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत चारुशीला कुटे शिवसेनेकडून निवडून आल्या होत्या. त्यांनी आकुर्डी भागाचे  महापालिकेत प्रतिनिधित्व केले. शुक्रवारी त्यांना थोडा त्रास होऊ लागला. त्यामुळे उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान आज रात्री आठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

_MPC_DIR_MPU_II

निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत चारुशीला कुटे यांच्या पार्थिवावर रात्री दहा वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.