Akurdi News: दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शनिवारी आरोग्य शिबीर

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त येत्या शनिवारी (दि.31) मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आकुर्डीत शनिवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत हे शिबिर होणार आहे. माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधान परिषदेतील पक्ष प्रतोद शशिकांत शिंदे यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन होणार आहे.

सर्वसामान्य नागरिकांसाठी अहोरात्र झटणाऱ्या आणि नागरिकांविषयी त्यांची असलेली सामाजिक बांधिलकीची जाणीव लक्षात घेऊन आकुर्डीत जावेद शेख यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये रक्तदान शिबिर, प्रत्येक रक्तदात्यास ब्लुटूथ हेडफोन भेट, मोफत रक्त तपासणी (आवश्यक असणाऱ्या सर्व चाचण्या), मोफत सिटी स्कॅन( CT Scan), एमआरआय, मोफत एक्स रे, दंत तपासणी ( डेंटल XRay मोफत), नेत्र तपासणी( 45 वर्षापुढील नागरिकांना मोफत चष्मा वाटप), स्त्री रोग तपासणी करण्यात येणार आहे.

नागरिकांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर आवश्यक त्या चाचण्या केल्या जातील. तपासणीसाठी येताना नागरिकांनी आपले जुने रिपोर्ट घेऊन यावेत. या आरोग्य शिबिराचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन झाकीर रमजान शेख यांनी केले आहे.

आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघ, प्रगती महिला विकास मंडळ, आपुलकी मित्र मंडळ, जावेद शेख मित्र परिवार यांनी आयोजनात पुढाकार घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.