Akurdi News : इखलास सय्यद राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते इखलास सय्यद यांची पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. इखलास सय्यद हे राष्ट्रवादीचे दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांचे मामे बंधू आहेत.

यावेळी आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अण्णा कुऱ्हाडे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर ननावरे, श्री संत सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष चौधरी व प्रवीण पवार उपस्थित होते.

‘इखलास यांनी मागील वीस वर्षांत सामाजिक कार्यात भरीव कामगिरी केली आहे. भविष्यात ते राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येय धोरणे, विचार प्रभावीपणे रुजवतील,’ अशा विश्वास अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. ‘पक्षाने दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडू,’ असे इखलास सय्यद यांनी यावेळी सांगितले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.