Akurdi News : राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान ठेवणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य – बशीर सुतार

एमपीसीन्यूज : प्रजासत्ताक दिनी ( Republic Day) राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान (respect the national flag) व्हावा हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. त्यामुळे 26 जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी प्रत्येकाने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा. तसेच प्लॅस्टीक ध्वजाचा ( Plastic Flag वापर करू नये, असे आवाहन शिवसेना पिंपरी चिंचवड कार्यालय प्रमुख बशीर सुतार  ( Shivsena office chief Bashir Sutar) यांनी केले आहे.

याबाबत सुतार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर खराब झालेले, फाटलेले, माती लागलेले राष्ट्रध्वज सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमानंतर कार्यक्रम स्थळी इतरत्र पडलेले सर्रास आढळून येत असतात. राष्ट्रध्वज हे राष्ट्राची अस्मिता आहेत. त्यामुळे त्यांचा अवमान होऊ नये याची खबरदारी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, सुजाण नागरीक, महापालिका, महापालिका शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आरोग्य संस्था, सार्वजनिक मंडळे, सेवाभावी संस्था यांनी आपलाआपल्या हद्दीतील पोलिसांच्या मदतीने प्लॉस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी.

तसेच विक्रेत्यांनी प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करू नये, असे आवाहन बशीर सुतार यांनी निवेदनात केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.