Akurdi News: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडोबा यात्रा रद्द

एमपीसी न्यूज – दरवर्षी मोठ्या भक्तीभावाने व उत्साहाने साजरी होणारी आकुर्डीतील खंडोबाची यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.

खंडोबा देवस्थान ट्रस्ट मंडळाच्या पदाधिका-यांची नुकतीच बैठक झाली. त्यात ग्रामस्थांचा विचार घेण्यात आला. त्यानंतर यात्रा रद्दच निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष विठठ्ल काळभोर आणि ट्रस्टचे सचिव अ‍ॅड. संजय दातीर-पाटील यांनी दिली.

दरवर्षी पौष शुद्ध षष्ठीला आकुर्डीतील ग्रामदैवत खंडोबाची यात्रा असते. दरवर्षी दीड ते दोन लाख भाविक दर्शनासाठी येत असतात.

यंदा ही यात्रा मंगळवार (दि. 12) आणि बुधवार (दि. 13) या दोन दिवशी होती. मात्र, कोरोनाच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.