Akurdi News : ‘एमआयडीसी’त कामगारांना ये-जा करण्यासाठी पीएमपीएल सेवा सुरू करा ; डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात राहणारे हजारो असंघटित कंत्राटी आणि हंगामी कामगार चाकण, म्हाळुंगे, तळवडे, भोसरी, पिंपरी, चिंचवड या एमआयडीसी तसेच, हिंजवडी फेज क्र. 1, 2 आणि 3 च्या औद्योगिक क्षेत्रात कामाला जातात. कामगारांना कामावर जाण्यासाठी येणारा प्रवास खर्च मोठा आहे. त्यामुळे ‘एमआयडीसी’त ये-जा करण्यासाठी माफक दरात पीएमपीएल सेवा सुरू करावी, अशी मागणी डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाचे अमिन शेख, स्वप्नील जेवळे, गणेश दराडे, सतीश मालुसरे, सचिन देसाई, सोनाली शिंदे, अर्चना इंगोले, रंजिता लाटकर, रिया सागवेकर, किसन शेवते, ख्वाजा जमखाने यांच्या वतीने हि मागणी करण्यात आली आहे. याबबात पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक राजेन्द्र जगताप, पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर उषा ढोरे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन पाठवले आहे.

शहरातील आकुर्डी रेल्वे स्टेशन, निगडी, त्रिवेणीनगर, तळवडे, घरकुल वसाहत, चिंचवडगाव, चिखली गाव, नेहरूनगर, संत तुकारांनगर, पिंपळे सौदागर, पिंपळेगुरव, काळेवाडी या परिसरातून, तळेगाव, म्हाळुंगे, चाकण अशी अप डाउन बससेवा फक्त कामगारांसाठी सुरु करावी. तसेच, हिंजवडी फेज क्र.1, 2 आणि 3 येथे काम करणाऱ्या कामगारांना पिंपरी चिंचवड शहरातून प्रवासी सेवा द्यावी असे त्यांनी म्हंटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.