Akurdi News : लोकमान्य हॉस्पिटलच्या डॉ. श्रीकृष्ण जोशी यांना कोव्हिड योद्धा पुरस्कार

एमपीसी न्यूज – लोकमान्य हॉस्पिटलच्या सहयोगी उपाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण जोशी यांना कोव्हिड योद्धा म्हणून गौरवण्यात आले आहे. डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस पाटील यांच्या हस्ते डॉ. जोशी यांचा सन्मान करण्यात आला. आकुर्डी येथील डी. वाय. पाटील शिक्षण संकुलात स्वातंत्र्य दिनी हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी माय लॅबचे कार्यकारी अध्यक्ष राहुल पाटील, डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलहगुरू प्रभात रंजन, शिक्षण संकुलाचे संचालक डॉ. निरज व्यवहारे तसेच शिक्षक शिक्षेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जीवनरेखा रुग्णालयाचे डॉ. राजेंद्र चावर व यशवंतराव चव्हाण रूग्णालयाच्या परिचारिका प्रमुख संगीता पाटील यांचा देखील सन्मान करण्यात आला.

लोकमान्य हॉस्पिटलच्या माध्यमातून दहा रूग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तसेच आत्मनिर्भर भारत अंतर्गत माय लॅबने कोव्हीडच्या काळात विक्रमी चाचणी किट करून चाचणीचे प्रमाण वाढविण्यात मदत झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निरज व्यवहारे यांनी केले तर, डॉ. पाटकर यांनी आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.