Akurdi News : म्हाळसाकांत विद्यालयाचा ग्रंथालय आपल्या दारी अंतर्गत ‘वाचू आनंदे’ उपक्रम 

एमपीसी न्यूज – वाचन संस्कृती जपण्यासाठी म्हाळसाकांत माध्यमिक विद्यालय, आकुर्डी शाळेने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ग्रंथालय आपल्या दारी अंतर्गत ‘वाचू आनंदे’ या उपक्रम सुरु केला आहे. म्हाळसाकांत माध्यमिक विद्यालयात शनिवारी (दि.18) या उपक्रमाची सुरुवात झाली. 

कार्यक्रमासाठी कोईनोनिया एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जोसेफ हिवाळे, संचालिका डॉ. एस्तेर हिवाळे, प्राचार्य प्रकाश भापकर, उपमुख्याध्यापक सुधिर रोकडे, पर्यवेक्षक सखाराम पुंडे, जयश्री शेजवळ, मनिषा साठे, संजय गिराम, वार्डन त्रिवेणी बनसोडे व विद्यार्थी उपस्थित होते.

कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्याने वाचन संस्कृती जोपासण्यासाठी शिक्षकांनी हा उपक्रम सुरू केला आहे. ‘दर शनिवारी ग्रंथालय समितीच्या वतीने कथाकथन, पुस्तक परिचय, गोष्टी सांगणे असे उपक्रम राबविले जाणार आहेत,’असे उद्घाटक म्हाळसाकांत विद्यालयाचे प्राचार्य सुनिल लाडके यांनी सांगितले.

कोईनोनिया एज्युकेशन फाउंडेशनचे हार्टस ॲन्ड हॅन्डस इंटरनॅशनल स्कूल अॅकॅडमीने म्हाळसाकांत विद्यालयात शिकणाऱ्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या 40 मुलींचे पालकत्व घेतले आहे. वसतिगृहात राहणाऱ्या या विद्यार्थिनींचे चिल्ड्रेन होमच्या माध्यमातून पालकत्व स्वीकारले आहे. येथे मुलींना अभ्यासाबरोबर आपल्या पायावर उभे राहण्यासाठी व्यावसायिक कौशल्य शिकविली जातात.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा खळदकर, मोनिका भांडेकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.