Akurdi News : अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा – इखलास सय्यद

एमपीसी न्यूज – अल्पसंख्यांक (Akurdi News) समाजातील विद्यार्थ्यांकरिता विविध शिष्यवृत्ती योजना जाहीर झाली आहे. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष इखलास सय्यद यांनी केले.

अल्पसंख्यांक समाजातील जैन, शीख, ख्रिश्चन, नवबौद्ध व मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने दरवर्षी शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात येते. इयत्ता पहिली ते पदवीत्तर पदवी व उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. इयत्ता पहिली ते दहावीसाठी प्री मॅट्रिक, इयत्ता 11 वी ते पदवीपर्यंत पोस्ट मॅट्रिक, उच्च तंत्र अभियांत्रिकी व व्यवसायिक अभ्यासक्रमसाठी मेरिट कम मिन्स आणि मुलीसाठी विशेष बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती अशा विविध शिष्यवृत्ती योजना जाहीर झाल्या आहेत.

Kusgaon Gram Panchayat : मृत्यू प्रमाणपत्रासाठी लाच घेणाऱ्या मावळातील सरपंच व ग्रामसेवकाला अटक

15 ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थी ऑनलाइन (Akurdi News) अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जनसंपर्क कार्यालय मेनरोड दत्तवाडी, आकुर्डी येथे संपर्क साधावा असे आवाहन सय्यद यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.