Akurdi News: जुन्या मित्राच्या चिरंजीवाला इच्छा नसताना ‘सीएम’ होण्यासाठी भाग पाडले – शरद पवार

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात माझा किंचित सहभाग होता. नेतृत्व कोणी करायचे याबाबत 2 ते 3 नावे समोर आली. उद्धव ठाकरे तयार होत नव्हते. आमदारांच्या बैठकीत ते माझ्या शेजारी बसले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आपले जिव्हाळ्याचा संबंध होते. त्यांचे महाराष्ट्रासाठी मोठे योगदान आहे. उद्धव यांची अजिबात इच्छा नसताना दिलदार मित्राच्या चिरंजीवाचा आपण  मुख्यमंत्रीपदासाठी सक्तीने हातवर करत त्यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे ठाकरे यांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचे होते. या देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपात तथ्य नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. कृपा करुन फडणवीस यांनी चुकीचे आरोप करू नये, हे योग्य नाही, असेही ते म्हणाले.  

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांच्या नेतृत्वाखाली आजी-माजी नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांनी आकुर्डीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे. मुख्यमंत्रिपदाची त्यांची महत्त्वकांक्षा होती, ती त्यांनी पूर्ण केली. आता त्याला तत्वज्ञानाची जोड देत आहेत. ते त्यांनी थांबवावे असे विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीस म्हणाले होते.

यावर बोलताना शरद पवार म्हणाले, राज्यात सरकार स्थापन करताना नेतृत्व कोणाकडे द्यायचा यावर चर्चा सुरु होती. त्यावेळी 2-3 नावे समोर आली. उद्धव ठाकरे यांना अजिबात मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. मी उद्धव ठाकरे यांचे हात वर केले, त्यांच्या ध्यानीही नव्हतं अन् मनीही नव्हते. मीच म्हटलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. माझी फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे की असे आरोप करू नका. हे योग्य नाही.

पाच वर्षे त्यांच्यामुळे तुम्ही सत्तेवर होतात. स्वतः फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बरेच काही माहिती आहे, असेही पवार म्हणाले. सरकारमधील काही मंत्र्यांकडे वसुली करण्यासाठी सॉफ्टवेअर असल्याचे फडणवीस म्हणाले होते. या आरोपालाही पवार यांनी उत्तर दिले असून वसुलीची चीप अथवा सॉफ्टवेअर असेल तर त्यांनी दाखवावे. आमच्या ज्ञानामध्ये भर पडेल.

उद्धव ठाकरे यांची काम करण्याची पद्धत वेगळी!

प्रत्येकाची काम करण्याची वेगळी पद्धत असते. मी मुख्यमंत्री असताना एखादी घटना घडल्यास तत्काळ घटनास्थळी जात होतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कामाची पद्धत वेगळी असते. ते एका जागेवर बसून निर्णय घेतात. अतिवृष्टीसह विविध संकटे महाराष्ट्रावर आली. मुख्यमंत्री ठाकरे त्यांच्या सहाका-यांनी पूर्ण ताकतीनिशी त्या संकटांचा मुकाबला केला. कोरोनाच्या संकटात प्रयत्नांची पराकाष्ठा केली. जनतेला संकटातून बाहेर काढले. त्यामुळे घरी बसून काम करतात. यावरुन ठाकरे यांच्यावर टीका-टिप्पणी करणे योग्य नसल्याचेही पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.