Akurdi News: गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ‘पीसीईटी’चा राज्यपालांच्या हस्ते ‘भारत लीडरशिप अवॉर्ड’ने गौरव

एमपीसी न्यूज – एलकेजी ते पीएचडीपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असल्याबद्दल पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टला (पीसीईटी) ‘भारत लीडरशिप अवॉर्ड 2020″ देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील यांनी 1990 साली पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) ची स्थापना केली. तीस वर्षात या संस्थेने शिक्षण क्षेत्रात स्वत:च्या स्वतंत्र ठसा उमटवला आहे.

पीसीइटीची धुरा ज्ञानेश्वर लांडगे यांच्या खांद्यावर आहे. पीसीईटीचे आकुर्डी आणि रावेत येथे प्रशस्त व अत्याधुनिक सुख, सुविधांनी संपन्न कॅम्पस आहे. येथे एलकेजी ते पीएचडी पर्यंतचे विविध शाखांचे शिक्षण उपलब्ध आहे. सध्या संस्थेच्या आठ शैक्षणिक शाखा आहेत.

यामध्ये पीसीसीओई (आकुर्डी), पीसीओई ॲण्ड आर (रावेत), पीसीबी, एसबीपीआयएम, एसबीपीसीओएडी, एसबी पाटील ज्युनियर कॉलेज, एसबी पाटील पब्लिक स्कूल, पुणे बीजनेस स्कूल अशा आठ शाखा तर दहा हजारांहून जास्त विद्यार्थी आणि एक हजारांहून जास्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आहे.

एस.बी.पाटील स्कूलला ब्रिटीश कौन्सिलची मान्यता आहे. पीसीसीओई या अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘नॅक’ ची मान्यता आणि ‘एनबीए’ नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिएशन ची मान्यता आहे. एसबीपीआयएम या व्यवस्थापन महाविद्यालयाला देखील ‘नॅक’ची मान्यता आहे. तसेच एसबीपीसीओएडी या आर्किटेक्चर महाविद्यालयाला ‘कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर’ ची मान्यता आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असल्याबद्दल पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टला (पीसीईटी) ‘भारत लीडरशिप अवॉर्ड 2020″ देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. संस्थेच्या कार्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.