Akurdi News : गरीब विद्यार्थ्यांना मोफत हायस्पीड इंटरनेट व स्मार्ट फोन द्या – डीवायएफआय

रोजगार आणि आर्थिक समस्या यामुळे त्यांना इंटरनेट सेवा व स्मार्ट फोन घेण्यासाठी समस्या भेडसावत आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड, पुणे शहर व ग्रामीण भागातील अनेक गरिब विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. रोजगार आणि आर्थिक समस्या यामुळे त्यांना इंटरनेट सेवा व स्मार्ट फोन घेण्यासाठी समस्या भेडसावत आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी हायस्पीड इंटरनेट व स्मार्ट फोन मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पाठवण्यात आले आहे.

गणेश दराडे, सचिन देसाई, अमिन शेख,  स्वप्नील जेवळे, सतीश मालुसरे, अविनाश लाटकर, किसन शेवते, संतोष गायकवाड, विनोद चव्हाण यांच्य वतीने हे निवेदन देण्यात आले आहे.

शहरातील चिखली, तळवडे, भोसरी, आकुर्डी, निगडी, कासारवाडी, वाल्हेकरवाडी, रावेत, थेरगाव, चिंचवड, मंचर, चाकण, मावळ, जुन्नर या भागातील विद्यार्थ्यांना भाड्याच्या घरात आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना या डिजिटल शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.

त्यामुळे प्रत्येक गरीब विद्यार्थ्याला लॅपटॉप, टॅब किंवा अण्ड्रॉइड मोबाइल मोफत द्यावेत. तसेच यासाठी लागणारा इंटरनेटचा पुरेसा डेटा मोफत द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.