Akurdi News : टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत राजेंद्र तरस स्पोर्टस फाउंडेशनचा दणदणीत विजय

0

एमपीसीन्यूज : माजी महापौर आझमभाई पानसरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत किवळे-विकासनगर येथील श्री राजेंद्र तरस स्पोर्टस फाउंडेशनने विजेतेपद पटकावले. या संघाला रोख 51  हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले.

तर उपविजेतेपद मिळविणाऱ्या शिवतेज संघ प्राधिकरण या संघाला 31  हजार रुपये आणि चषक प्रदान करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

या स्पर्धेत ‘मॅन ऑफ दि सिरीज’चा बहुमान सागर वाल्मिकी व ‘बेस्ट बॉलर’चा किताब रवी पंडित या राजेंद्र तरस स्पोर्टस फाउंडेशन या संघाच्या खेळाडूंनी मिळविला. माजी महापौर आझम पानसरे यांच्या हस्ते विजेत्या संघाला बक्षीस वितरण करण्यात आले.

राजेंद्र तरस स्पोर्टस फाउंडेशन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी शिवतेज संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ गड्यांच्या मोबदल्यात ४९ धावसंख्या उभारली. त्यानंतर राजेंद्र तरस स्पोर्टस फाउंडेशन संघाने ४ षटकांमध्ये दणदणीत विजय मिळवला.

राजेंद्र तरस स्पोर्टस फाउंडेशनचा कर्णधार तुषार शिंदे तसेच रवी पंडित, प्रमोद पोळ आदी खेळाडूंनी सुरेख खेळ करुन संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला. संघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र तरस यांनी संघाची सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment