Akurdi News : दळवीनगर येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद;100 पिशव्या रक्त संकलन

एमपीसीन्यूज : सामाजिक कार्यकर्ते पै. किरण ज्ञानेश्वर दळवी यांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दळवीनगर येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शंभर रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या.

शिवसेना शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, माजी नगरसेवक अनंत को-हाळे आदी मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

कोरोनामुळे सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक जाणिवेतून पै.किरण दळवी यांनी पिंपरी चिंचवड ब्लड बँकेच्या सहकार्यातून रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरासाठी शंभर दात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्याचा अपघाती एक लाख रुपयांचा विमा काढण्यात आला.

दिनेश मालुसरे, भरत धिमते, निलेश नवले, अविनाश दळवी,अविनाश शेंडे, संतोष जाधव व दळवी नगर मित्र परिवार यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.