Akurdi News: दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोना काळात विक्रमी 145 जणांनी रक्तदान केले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन झाले. ज्येष्ठ नेते आझम पानसरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर योगेश बहल, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, ज्येष्ठ नेते इकबाल खान, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, नगरसेविका वैशाली काळभोर, सुलक्षणा शिलवंत, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, माजी नगरसेवक दत्ता पवळे,प्रदेश कार्यध्यक्ष रविकांत वरपे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर,युवती अध्यक्ष वर्षा जगताप, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष यश साने, अल्पसंख्यांक अध्यक्ष युसूफ कुरेशी आदी उपस्थित होते.

या आरोग्य शिबिरात नागरिकांनी मोफत रक्त तपासणी, मोफत नेत्र तपासणी , मोफत चष्म्या वाटप, मोफत दंत तपासणी, मोफत MRI मोफत CT SCAN ,मोफत XRAY मोफत स्त्री रोग तपासणी या सर्वांचा लाभ घेतला. यावेळी 145 जनांनी रक्तदान केले. कोरोना काळात आणि पुरग्रस्तांसाठी मदत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आकुर्डीतील अस्तित्व फाउंडेशन आणि खिदमत ए आवाम वेल्फेअर या सामाजिक संस्थाचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

शिबिरासाठी प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. अमित वाघ , प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ. देवदत्त कांबळे, डॉ. अथर्व देवदत्त कांबळे, मोरया ब्लड बँक, व नेत्र तपासणीसाठी हेल्प मेडिकल चॅरिटेबल फाउंडेशन सातारा यांचे विशेष सहकार्य लाभले.

झाकीर रमजान शेख , शानुर हमीद शेख यांनी आयोजन केले होते. शिबिराचे संयोजन आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघ, प्रगती महिला विकास मंडळ, आपुलकी मित्र मंडळ व समस्त जावेद शेख मित्र परिवार यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.