Akurdi News : कोरोना रुग्णांसाठी आकुर्डी रुग्णालय लवकरात लवकर सुरू करा – मीनल यादव

एमपीसीन्यूज :  महापालिकेच्या वतीने आकुर्डी येथे उभारण्यात येत असलेलया दोनशे बेडच्या रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करुन हे रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी तातडीने सुरु करावे, अशी मागणी शिवसेना नगरसेविका मीनल यादव यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

यासंदर्भात नगरसेविका यादव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. आकुर्डी येथे महापालिकेच्या वतीने दोनशे बेड्चे रुग्णालय उभारण्यात येत आहे. या रुग्णालयाचे बांधकाम अनेक वर्षांपासून चालू आहे. सद्यपरिस्थितीत हे रुग्णालय पूर्णत्वास आले आहे. फक्त थोडेच काम बाकी आहे.

सध्या शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणात वाढत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. कोरोना रुग्णांसाठी महापालिकेच्यावतीने शहरात विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर आणि जम्बो कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात आले आहेत. मात्र, ही तात्पुर्ती व्यवस्था आहे.

त्यावर होणारा खर्च हा कालांतराने शहरातील नागरिकांच्या उपयोगास येणार नाही. या पार्श्वभूमीवर आकुर्डी येथे उभारण्यात येणारे रुग्णालय रुग्णसेवेत रुजू झाल्यास अन्य रुग्णालयांवर येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

त्यामुळे या रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे असल्याचे नगरसेविका यादव यांनी निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव यांची स्वाक्षरी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.