Akurdi News : तहसीलदार गीता गायकवाड यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने गौरव

एमपीसीन्यूज : कोरोना संकट काळात शासनाच्या वतीने शहरातील गरजू नागरिकांना जेवण पुरविण्याची जवाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडल्याबद्दल तसेच शहरातील कोणीही उपाशी राहणार नाही याची विशेष खबरदारी घेतलेल्या अप्पर पिंपरी चिंचवडच्या तहसीलदार गीता गायकवाड यांचा उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने कोरोनायोद्धा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

आकुर्डी येथील अप्पर तहसील कार्यालयात हा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, संजय भिसे यांच्याहस्ते तहिसलदार गायकवाड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी अतुल पाटील, शैलेष बासुतकर, विजयकुमार चोबे आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

कुंदा भिसे म्हणाल्या, पोलिस, डाॅकटर, सफाई कर्मचारी हे कोरोना संकट काळात जीवाची पर्वा ना करता कार्यरत होते. त्यामुळे कोरोना काळात जनतेसाठी या कोरोना योद्धयांची खुप मोठी मदत झाली.

पुरस्काराला उत्तर देताना तहसीलदार गीता गायकवाड म्हणाल्या, उन्नति सोशल फाउंडेशनचे कार्य हे  समाजोपयोगी व कौतुकास्पद असते.  हे कार्य यापुढेही असेच सुरु ठेवा.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.