Akurdi News : आकुर्डी येथील आरोग्य शिबिरात 217 रुग्णांची तपासणी

0

एमपीसी न्यूज – कै. डॉ. सुनील बाणखेले यांच्या  स्मृती दिनानिमित्त शिवजयंतीचे औचित्य साधून आकुर्डी येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले. या आरोग्य शिबिरात 217 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

शिबिराचे उदघाटन डॉ. प्रशांत देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रकाश परदेशी, मधुकर काळभोर, कोंडीबा काळभोर, शरद काळभोर, गणेश धुमाळ, किसन काळभोर, सोहेल शेख आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

डॉ. अपर्णा बाणखेले यांनी या शिबिराचे आयोजन केले. आकुर्डी येथील ओम क्लिनीक येथे हे शिबीर पार पडले. या शिबिरात डॉ. लाल पॅथॉलॉजीच्या चमूने मधुमेह, हिमोग्लोबिन, थायरॉईड तपासणी केली. या शिबिरात परिसरातील 217 नागरिकांनी सहभाग घेतला. सहभागी झालेल्या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

नागेश्वर मित्र मंडळाचे बाळा वायकर, मंगेश कुटे, किसन कुटे, गणेश पारेकर यांनी आरोग्य शिबिराचे संयोजन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.