Akurdi News : मानवी हक्क विषयी सर्वसामान्य नागरिकांना जागृत करण्याची गरज – एम डी चौधरी

एमपीसी न्यूज – राज्यघटनेत प्रदान केलेल्या मानवी हक्क विषयी सर्वसामान्य नागरिकांना जागृत करण्याची गरज आहे असे मत, ह्यूमन राइट्स असोसिएशनचे अध्यक्ष एम.डी.चौधरी यांनी व्यक्त केले.

जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त ‘ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन’च्या आकुर्डी येथील मुख्य कार्यालयात मानवी हक्क याविषयी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी चौधरी बोलत होते. ते म्हणाले, शासकीय यंत्रणेत मानवी हक्क विषयक अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत, ते दूर करून मानवी हक्काची जोपासना करण्याची जबाबदारी मानव अधिकार कार्यकर्त्यांना पार पाडावी लागणार आहे.

याप्रसंगी उपस्थित संघटनेचे राष्ट्रीय कायदे सल्लागार ॲड. अनिल कुमार जाधव यांनी समाजातील प्रत्येक नागरिकाने जागृत होऊन आपल्या हक्कासाठी संविधानिक पद्धतीचा वापर केला पाहिजे असे सांगितले.

यावेळी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष देवकर, उपाध्यक्ष ओंकार शेरे, सचिन गाडे, जनसंपर्क अधिकारी लक्ष्मण दवणे, रुकसाना शेख, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष कैलास वाघमारे, रशीद खान सलीम सय्यद, सतीश घावटे मर्दान, सतीश सिलम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रघुनाथ रोकडे यांनी केले तर, आभार प्रदर्शन संतोष शेटे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.