Akurdi news: केंद्र सरकार विरोधातील जनतेच्या तीव्र प्रतिक्रिया स्वाक्षरी मोहिमेतून उमटणार – डॉ. रत्नाकर महाजन

शेतकरी व कामगारशेतकरी व कामगार कायद्याविरोधीत कॉंग्रेसची स्वाक्षरी मोहिम सुरु कायद्याविरोधीत कॉंग्रेसची स्वाक्षरी मोहिम सुरु

एमपीसी न्यूज – दुराचाराचे प्रतिक म्हणून उत्तर भारतात दस-याच्या दिवशी रावण दहन करतात. यावर्षी पहिल्यांदाच रावणाच्या पुतळ्याऐवजी उत्तर भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. गेल्या सत्तर वर्षात जे कधी झाले नाही ते आम्ही करुन दाखविले, असे जरा बीजेपीच्या तोंडून ऐकायला मिळाले तर बरे होईल, अशी खोचक टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी केली. केंद्र सरकारच्या विरोधातील जनतेच्या मनातील तीव्र प्रतिक्रिया स्वाक्षरी मोहिमेतून उमटणार आहेत, असेही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आकुर्डी येथे ‘किसान अधिकार दिनानिमित्त’ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ.महाजन बोलत होते.

यावेळी कामगार व शेतकरी विरोधी काळे कायदे करणा-या केंद्र सरकारच्या विरोधात स्वाक्षरी मोहीमेची सुरुवात करण्यात आली. शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते पटेल यांच्या प्रतिमेस आणि महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांच्या हस्ते स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, तुकाराम भोंडवे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे, शाम अगरवाल, ज्येष्ठ नेत्या शामला सोनवणे, हरीदास नायर, राजेंद्रसिंह वालिया, ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, परशूराम गुंजाळ, सतिश भोसले, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष किशोर कळसकर, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, सुरेश लिंगायत, भाऊसाहेब मुगूटमल, मेहताब इनामदार, मयूर जयस्वाल, गौरव चौधरी, विशाल कसबे, मॅन्युअल डिसूजा, भास्कर नारखेडे, पांडूरंग जगताप, चंद्रशेखर जाधव, विठ्ठल कळसे, हिरामण खवळे, मकरध्वज यादव, अक्षय शहरकर, बाबा बनसोडे, सुनिल राऊत, प्रतिभा कांबळे, आशा शहाणे, रणजित तिवारी, ओंकार चिमीगावे, समाधान सोरटे, लक्ष्मण बोडरे, रवी एनपी, अनिकेत आरकडे, आशा काकडे, मोहिणी पाटील, वैराग भंगाळे आदी उपस्थित होते.

यावेळी भाजपा अनुसूचित जाती सेलचे शहर उपाध्यक्ष मोहन वाघमारे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

डॉ. महाजन पुढे म्हणाले की, दस-याच्या दिवशी रावण म्हणून पंतप्रधान मोदींच्या पुतळ्याचे दहन करण्याची घटना सत्तर वर्षात प्रथमच घडली. लोकांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता, अनास्था, राग, संताप आणि असंतोषाचे हे प्रतिक आहे.

केंद्र सरकारच्या विरोधातील जनतेच्या मनातील हि तीव्र प्रतीक्रिया स्वाक्षरी मोहिमेतून उमटणार आहे. भाजपात आयात झालेले नेते वगळता सर्वजण अगोदर संघाचे स्वयंसेवक आहेत आणि मग भाजपाचे सदस्य आहेत.

भाजपाची अवस्था उधार उसणवारीवर चाललेल्या संसारासारखी आहे. 2014 च्या निवडणूकीत भाजपाला एकूण मतांच्या 33 टक्के आणि 2019 च्या निवडणूकीत एकूण मतांच्या 36 टक्के मते मिळाली आहेत.

आजही 64 टक्के लोक संघ परिवार, त्याचा विचार आणि बीजेपीच्या धोरणाविरोधात आहेत. तरीही 50 वर्षे सत्तेवर राहून, अशी वल्गना त्यांचे नेते करतात, अशी टीकाही डॉ. महाजन यांनी केली.

सचिन साठे म्हणाले, कृषी प्रधान देशातच बळीराजाला हक्क डावलून भांडवलदारांच्या दावणीला जुंपण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. दोन कोटी रोजगार दरवर्षी देऊ म्हणणा-या केंद्र सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत कबूली दिली की, देशातील 6,83,000 कंपन्या आता पर्यंत बंद पडल्या आहेत. त्यापैकी 1,42,000 कंपन्या महाराष्ट्रातील आहेत. यामुळे कोट्यावधी लोकांचा रोजगार बंद झाला.

केंद्र सरकार शेतकरी व कामगार विरोधी हे जुलमी कायदे जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत कॉंग्रेस पक्ष देशभर सत्याग्रह आंदोलन सुरु ठेवणार आहे. तसेच या स्वाक्षरी मोहिमे अंतर्गत शहरातून 1 लाख सह्यांचे निवेदन कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे देणार आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.