Akurdi : लॅपटॉपला जोडला हॉटस्पॉट आणि तीन लाख लांबवले ‘ऑन द स्पॉट’

एमपीसी न्यूज – परक्या व्यक्तीच्या हातात मोबाइल देणे एका कारचालकाला चांगलेच महागात पडले आहे. कारचालकाचा विश्वास संपादन करून एका भामट्याने त्याच्या लॅपटॉपला हॉटस्पॉट जोडण्यासाठी कारचालकाचा मोबाईल फोन घेतला. त्याद्वारे भामट्याने कारचालकाच्या बँक खात्यातील तीन लाख 5 हजार परस्पर हस्तांतरित केले.

कारचालक समीर वसंत दिवेकर (वय 28, रा. जुहूगाव, वाशी, मुंबई) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 20) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ऋषिकेश मोहन बोंबले (रा. वेताळे, खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 6 ऑगस्ट 2019 रोजी निगडी येथे घडला. आरोपीने त्याचे नाव अक्षय बोंबले असल्याचे खोटे सांगून वाशी येथून फिर्यादी यांची कार भाड्याने घेतली. कार घेऊन तो आकुर्डी येथील पीएफ ऑफिस येथे आला. तेथे आरोपीने लॅपटॉपला हॉटस्पॉट जोडण्याच्या बहाण्याने आरोपी फिर्यादी समीर यांचा 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल घेतला. बोंबले याने मोबाईल बँकिंगद्वारे समीर यांच्या बँक खात्यावरील तीन लाख 5 हजार रुपये परस्पर हस्तांतरित करून त्यांची तीन लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.