_MPC_DIR_MPU_III

Akurdi : पीसीसीओईच्या पटांगणावर ‘केपीआयटी स्पार्कल- 2019’ स्पर्धेचे आयोजन

पीसीसीओई आणि केपीआयटी संशोधन सामंजस्य करार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) आणि माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी उत्‍पादन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी केपीआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी निगडीतील पीसीसीओईच्या पटांगणावर ‘केपीआयटी स्पार्कल- 2019 ’ या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_IV

या स्पर्धेसाठी देशभरातील आयआयटी, आयआयएम्स, एनआयटी महाविद्यालयांसह विविध नामांकित महाविद्यालयातील 22 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 2000 नाविन्यपूर्ण संकल्पनांची निवड करण्यात आली. यातून अंतिम 30 प्रकल्पांचे केपीआयटी स्पार्कल स्पर्धेमध्ये सादरीकरण करण्यात येणार आहे. यातून प्रथम क्रमांकाच्या प्रकल्पाला दहा लाख रुपयांचे प्लॅटिनम, व्दितीय क्रमांक पाच लाख रुपये सुवर्ण, तृतीय क्रमांक अडीच लाख रुपये रौप्य आणि लोकप्रिय तीन प्रकल्पांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II
  • दि. 23 फेब्रुवारीला अभियांत्रिकीशी संबंधित विविध विषयांवर सहा चर्चासत्र आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील अभियांत्रिकीचे प्राध्यापक, आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी ठरलेले उद्योजक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दि. 24 फेब्रुवारीला अंतिम तीस प्रकल्पांचे सादरीकरण आणि बक्षिस वितरण समारंभ ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभुषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

संशोधन निरीक्षण वृत्तीस चालना मिळावी, हाच उद्देश
केपीआयटी स्पार्कलच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) आणि माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी उत्‍पादन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी केपीआयटी यांच्या दरम्यान संशोधनासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधन निरीक्षण वृत्तीस चालना मिळावी, या संशोधनाचा उपयोग मानवी जीवनात व्हावा आणि समाजहित साध्य व्हावे. या मुख्य उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. यावेळी पीसीसीओई प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर, केपीआयटीचे सह उपाध्यक्ष राहुल उपलप, समन्वयक डॉ. शितलकुमार रवंदळे, प्रा. राहुल पाटील उपस्थित होते.

  • सर्व विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश
    केपीआयटी स्पार्कल या कार्यक्रमास सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मोफत आहे. तरी विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण पाहण्याच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. ए.एम. फुलंबरकर, समन्वयक डॉ. शितलकुमार रवंदळे, प्रा. राहुल पाटील यांनी केले आहे.
_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.