BNR-HDR-TOP-Mobile

Akurdi : जीवनविद्या मिशन केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

एमपीसी न्यूज – जीवनविद्या मिशन पिंपरी भोसरी शाखेने आकुर्डी केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त जाहिर प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत अंकुशजी  परहर यांचे ‘मन करा रे प्रसन्न’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

जीवन विद्या मिशनच्या आकुर्डी केंद्राचा शुक्रवारी (दि. 14) वर्धापन दिन आहे. यानिमित्त जीवन विद्या मिशन पिंपरी भोसरी शाखेने जाहीर प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात थोर तत्त्वज्ञ व समाजसुधारक सद्गुरु श्री वामनराव पै यांचे शिष्य अंकुशजी परहर यांचे ‘मन करा रे प्रसन्न’ या विषयावर जाहीर प्रबोधन होणार आहे.

  • हा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता आकुर्डी प्राधिकरण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान येथे होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष अमर गावडे, सचिव नारायण सांबरेकर, भाऊसाहेब देशमुख, कादंबरी पासलकर-डौल, संजय भगत, सुरेश जगताप आदींनी केले आहे.
HB_POST_END_FTR-A2