Akurdi : उलट बोलल्याच्या रागातून तरुणीने मित्रांच्या साथीने केली अल्पवयीन मुलाला कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज – उलट बोलल्याच्या रागातून तरुणीने(Akurdi) तिच्या मित्रांच्या सातीने एका अल्पवयीन मुलाला हाताने व कोयत्याने मारहाण केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.5) आकुर्डी येथील म्हाळसाकांत टौकत घडली आहे.

अल्पवयीन मुलाने याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी आरोपी मुलीसह सुजल पवार, सुमित कांबळे व एक नोळखी मुलगा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Maval : वन विभागाच्या जागेतील कामांचा अडसर होणार दूर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Akurdi)फिर्यादी हे त्यांच्या मित्रासह दुचाकीवरून जात होते यावेळी आरोपी मुलगी तिच्या मित्रासह कार मधून आली व तिने फिर्यादीने एक महिन्यापुर्वी उलट बोलल्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादील शिवीगाळ कऱण्यास सुरुवात केली.तसेच फिर्यादी याला पाठीवर कोयत्याने मारून जखमी केले. यावरून निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.