Akurdi : अपंग असल्याने विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दत्तवाडी, आकुर्डी येथे अपंग असल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पती गौरव विनायक दुर्वे (वय 38), सासरे विनायक दुर्वे (वय 66), सासू सुगंधा दुर्वे (वय 60), नणंद शिल्पा दुर्वे (वय 39, सर्व रा. गणेश मंदीरासमोर, आकुर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत 29 वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 25 एप्रिल 2019 ते 30 मे 2019 या कालावधीत ही घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी आपसांत संगनमत करून “तू पायाने अपंग आहेस. तुझ्याशी लग्ना लावून आम्ही फसलो,’ असे बोलून विवाहिला मारण्यासाठी अंगावर धावून आले. तसेच तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. याबाबत पोलीस उपनिरीक्षक सतेश जाधव अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.