Akurdi:  वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना मंगेश महाशब्दे यांनी दिल्या ‘पीपीई’ किट्स

एमपीसी न्यूज –  जीवाची पर्वा न करता कोरोना विरोधात लढणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वैद्यकीय सेवा पुरविणा-या अधिकारी, कर्मचा-यांना आकुर्डीतील मंगेश महाशब्दे यांनी  ‘पीपीई’ किट्स दिल्या आहेत. सामाजिक बांधिलकीतून त्यांनी ही मदत केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे समाजातील विविध घटकांकडून मदतीचा हात पुढे करण्यासाठी महापालिकेमार्फत आवाहन करण्यात आलेले आहे.  त्यानुसार देणगी स्वरुपात तसेच सीएसआर अंतर्गत अनेक संस्था महापालिकेस सहाय्य करित आहे. तसेच आता नागरिकांकडूनही देणगी स्वरुपात मदत मिळण्यास सुरुवात झालेली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून ‘शुभश्री’, आकुर्डी येथील रहिवासी मंगेश महाशब्दे यांनी दहा पीपीई किट्स महापालिकेमध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकीय सेवा पुरविणा-या अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता देण्यात आल्या आहेत. या किट्स हे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील अधिकारी,कर्मचारी यांना कोरोना विभागामध्ये कामकाज करण्याकरिता उपलब्ध करुन देण्यात आल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.