Akurdi : आकुर्डी रेल्वे स्थानकावरही ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’

एमपीसी न्यूज – रेल्वे स्थानकाच्या परिसरात रेल्वेचा डबा उभारून (Akurdi ) त्यामध्ये रेस्टॉरंट सुरु करण्याची संकल्पना मध्य रेल्वेकडून विविध स्थानकांवर राबवली जात आहे. पुणे रेल्वे स्थानकावर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरु झाले आहे. त्यापाठोपाठ आता आकुर्डी रेल्वे स्थानकावर देखील हे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरु करण्यासाठी पुणे विभागाकडून प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

रेस्टॉरंट ऑन व्हील या संकल्पनेतून सुरु झालेल्या या हॉटेलमध्ये स्वच्छ, ताजे आणि चांगले खाद्य पदार्थ दिले जाणार आहेत. त्यासाठी रेल्वे विभाग नामांकित हॉटेल कंपनीला रेस्टॉरंट ऑन व्हील चालविण्यासाठी देणार आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये स्वच्छतेसह दर्जेदार खाद्यपदार्थ मिळण्याची हमी दिली जात आहे.

PCMC : सर्वेक्षणात नोंदणी नसलेल्या अडीच लाख मालमत्ता सापडणार

आकुर्डी रेल्वे स्थानकावरून दररोज हजारो विद्यार्थी, चाकरमानी, नागरिक रेल्वेने प्रवास करतात. हे रेल्वे स्थानक कायम गजबजलेले असते. या स्थानकाचा अमृत रेल्वे स्थानकात देखील समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार स्थानकावर विविध सोईसुविधांची कामे केली जात आहेत. त्यातच आता रेस्टॉरंट ऑन व्हील देखील इथे सुरु होणार आहे.

आकुर्डी रेल्वे स्थानकासह शिवाजीनगर, मिरज आणि बारामती रेल्वे स्थानकावर देखील रेस्टॉरंट ऑन व्हील उभारण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचे पुणे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी सांगितले.

रेल्वे स्थानकावरून प्रवास करणारे प्रवासी तसेच परिसरातील नागरिक या रेस्टॉरंट ऑन व्हील मध्ये येऊ शकतात. रेस्टॉरंट ऑन व्हीलमध्ये खाण्यासह पार्सलची देखील इथे सोय असेल. त्याचबरोबर रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील रेस्टॉरंट ऑन व्हीलमधून खाद्यपदार्थ ऑनलाईन माध्यमातून मागवता येतील. रेस्टॉरंट ऑन व्हील असलेल्या स्थानकाच्या 60 किलोमीटर अंतरावरून हे खाद्यपदार्थ (Akurdi ) ऑर्डर करता येऊ शकतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.