Akurdi : RTE शिबिरास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- मोफत शिक्षण हक्क कायदा 2009 अनुसार व महाराष्ट्र राज्य शासनाच्या 2011 च्या अधिसूचनेनुसार 25% आरक्षणाअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या शालेय प्रवेशाची माहिती देण्या करीता नगरसेवक जावेद शेख आणि आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघामार्फत आकुर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या पालक शिबारास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

यावेळी नगरसेवक जावेद शेख, नबीलाल मुलाणी, विश्वनाथ मोरे, वसंत सोनार, सुभाष चौधरी, संघाचे अध्यक्ष अण्णा कुऱ्हाडे, इखलास सय्यद कामगार नेते अशोक माने ,रमेश भोरकर,प्रकाश परदेशी आदी उपस्थित होते.

 

यावेळी नगरसेवक जावेद शेख यांनी सांगितले की, गेल्या नऊ वर्षांपासून ही योजना आम्ही राबवीत असून गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर जे समाधान पालकांच्या चेहऱ्यावर बघायला मिळते यातच आम्ही केलेल्या कष्टाचे चीज होते. या योजनेत प्रवेश मिळाल्यानंतर इयत्ता 8 वी पर्यंत शिक्षण मोफत असून शहरातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळण्याची संधी असते त्या मुळे सर्व जाती धर्माच्या जास्तीत जास्त पालकांनी याचा लाभ घ्यावा.

 

_MPC_DIR_MPU_II

यावेळी इखलास सय्यद यांनी पालकांना मार्गदर्शन करताना
25 % आरक्षण म्हणजे काय, कोण कोणते विद्यार्थी लाभ घेऊ शकतात, वंचित घटक आणि दुर्बल घटक म्हणजे काय, ऑनलाइन अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावी, प्रवेशासाठी कोणती कागदपत्र लागतात, कोण कोणत्या शाळांचा समावेश होतो यासह संपूर्ण माहिती दिली.

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील मोरे, जावेद पठाण, अनिल पाटील अनंत इंगळे, सुयोग काळभोर, निलेश कदम यांनी परिश्रम घेतले.

 

सूत्र संचालन प्रकाश परदेशी यांनी केले तर आभार सुभाष चौधरी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.