Akurdi : आकुर्डी येथे शिवजयंती साजरी

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथील ऐश्वर्यम कम्फर्ट सोसायटी येथे सोमवारी (दि.19) शिवजयंती ( Akurdi)  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मदिनाचे औचित्य साधून जेष्ठ नागरिकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Pune : बुधवार पेठ येथील पटवर्धन वाड्याची भिंत कोसळली, सुदैवाने जिवीत हानी नाही

यावेळी सोसायटी मधील सन्माननीय महिला भगिनींनी पारंपरिक वेशभूषेत पाळणा आणि बालगोपालांच्या हस्ते शिवकालीन वेषभूषा परिधान करून शिवजयंती साजरी करण्यात आली.

सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलींद पांडे, निलेश जाधव, सेबी पॉल, निलेश डोईजोडे, अमित बाबर, कल्याण कलपे, पंकज ताले, श्रध्दा जाधव आणि अंकुर पाडेकर यांनी संयोजन केले होते. आभार प्रदर्शन सोसायटीचे अध्यक्ष अमोल गोरखे यांनी ( Akurdi)  केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.