Akurdi : श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे तिळगुळ समारंभ उत्साहात

एमपीसी न्यूज- श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज, पिंपरी चिंचवड विभाग यांच्या वतीने तिळगुळ समारंभ व हळदी कुंकूवाचा कार्यक्रम घेण्यात आला. रविवारी (दि. 26) आकुर्डी येथील खंडोबा मंदिर सांस्कृतिक भवन येथे समाज बांधवाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी प्रकाश आगरवले, सी. झेड्. खैरनार, तुकाराम शिंपी, किशोर भांडारकर, प्रशांत आहेर, पदाधिकारी, सदस्य व अनेक आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर दिवंगत समाज बांधवांना श्रध्दांजली वाहण्यात आली. नेहा शिंपी हिने गणेशवंदना तर मानसी जाधव हिने सुरेख नृत्य सादरीकरणाने उपस्थितीतांची मने जिंकली. यावेळी संस्कार महिला गट, चिंचवड यांनी मंगळागोर हा सांस्कृतिक कार्यक्रमातुन ” बेटी बढाव , बेटी पढा़व ” हा महत्त्वाचा संदेश दिला. सत्कारमुर्ती यांना शेवंतीची रोपे देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्लास्टिक पिशव्याचा वापर टाळावा याकरिता महिलांना कापडी पिशव्यांचे वाण देण्यात आले.

प्रमुख पाहुण्या मनीषा भांडारकर, महिला अध्यक्षा कल्पना ब्राह्मणकर व समाज अध्यक्ष संजय संदानशिव यांनी समाज बंधु भगिनीना तिळगुळ समारंभाच्या आयोजनाचे महत्त्व समजावून सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रंजना जाधव, नेहा खैरनार, रुपाली बाविस्कर , वनिता खैरनार , महेंद्र जगताप, महेश जाधव, महेश बोरसे , मनोहर शिंपी, प्रवीण मांडगे,रमेश इसई, समीर भांडारकर, उमेश बाविस्कर, मनोज खैरनार आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शुभांगी पवार व श्री. भट्टूलाल बागुल यांनी केले. सचिव मनोहर शिंपी यांनी आभार प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.