Akurdi News : कुणाला पराजय करण्यासाठी नाही तर; स्वतः जिंकण्याकरिता खेळा – शकुंतला खटावकर

एमपीसी न्यूज – खेळ म्हंटले की जय पराजय हा आलाच मात्र खेळ कोणताही असो त्यात कुणाला पराजय करण्यासाठी नाही , तर स्व:ताला जिंकणयाकरिता खेळा, (Akurdi News) असे प्रतिपादन महान कब्बड्डीपटु पहिल्या महिला अर्जुन पारितोषिक विजेत्या व जेष्ठ कब्बड्डीपटु शंकूतला खटावकर यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड व इखलास सय्यद मित्र परिवार यांच्या वतीने आकुर्डी दत्तवाडी प्रभागातील विविध क्रीडा  क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ते शहर पातळी वरील खेळाडूंचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी,  शिवाजी उदय मंडळ चिंचवडचे अध्यक्ष सदाशिव गोडसे, प्रमोद देशपांडे, झाकिर रमजान शेख, ज्ञानेश्वर ननावरे, अण्णा भोसले, रमेश बनसोड , यशवंत भालेराव , दत्ता बोरहाड़े , शाहरुख शेख इत्यादि उपस्थित होते.

Pune News : पुण्यासह राज्यात थंडी पुन्हा थैमान घालणार

खटावकर पुढे म्हणाल्या की, भारतीय आहार , कसुन सराव यांना प्राधान्य देत शीतपेय व मोबाईल या पासून युवकानी दूर रहावे. तसेच युवकांनी मोबाईलपेक्षा मैदानाला वेळ द्यावा. (Akurdi News) आपले ध्येय्य निश्चित करून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. तरच आजचा राष्ट्रीय खेळाडू उद्या ऑलम्पिक पर्यंत जावू शकेल. राष्ट्रीय खेळाडूंच्या मातांनी जिजामाता पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे देखील आवाहन त्यांनी केले.

आशियाई स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूसह आंतरराष्ट्रीय , राष्ट्रीय , राज्य , जिल्हा व शहर पातळी वरील 44 खेळाडूंना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. तर, काही क्रीडा शिक्षकांचा  सन्मान करण्यात आला.  खेळाडू प्रतिनिधी म्हणून आंतरराष्ट्रीय थाय बॉक्सिंगपटु तृप्ती निंबळे यानी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी विधानसभेचे कार्याध्यक्ष इखलास सय्यद  यांनी केले. तर, सूत्रसंचालन प्रकाश परदेशी यांनी  केले. सुभाष चौधरी यांनी आभार मानले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.