Akurdi : घरातील सर्वजण खरेदीसाठी बाहेर गेल्याचे हेरून अवघ्या सव्वा तासात फोडले घर

एमपीसी न्यूज – पती-पत्नी आपल्या लहान मुलाला घेऊन (Akurdi) खरेदीसाठी बाहेर गेले. सव्वा तासाने खरेदी करून घरी परत आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. सव्वा तासात चोरट्यांनी घरफोडी करून सव्वाचार लाखांचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 20) सायंकाळी सव्वासात ते साडेआठ वाजाच्या कालावधीत आकुर्डी गावठाण येथे घडली.

सर्वेश शाम कोटकर (वय 34, रा. आकुर्डी गावठाण) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सर्वेश हे बुधवारी सायंकाळी सव्वासात वाजता त्यांच्या पत्नी आणि लहान मुलाला घेऊन आकुर्डी बाजार पेठेत खरेदीसाठी गेले. बाजारातून खरेदी करून ते साडेआठ वाजता घरी आले. त्यावेळी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा कापलेला व दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता कपाट देखील तुटलेले होते.

Chikhali : कृष्णानगर पोलीस वसाहतीत भर दिवसा घरफोडी

कपाटातून चोरट्यांनी सोन्याचे गंठन, नेकलेस, दोन अंगठ्या, सोन्याच्या दोन चेन, कर्णफुल, नेकलेस सेट जुमका आणि टायटन (Akurdi) कंपनीचे घड्याळ असा एकूण चार लाख 25 हजारांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.