Akurdi : आयआयटी पवईच्या ‘आकार’ स्पर्धेत पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांचे यश   

एमपीसी न्यूज – आयआयटी पवई येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आकार’ या राष्ट्रीय अभियांत्रिकी स्पर्धेत पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळविले. 

यामध्ये अंकीत आढाव, गौरव गावंडे, धनंजय जोर्वेकर, शुभम बासरकर यांनी ब्रिज आयटी या स्पर्धेत विजेतेपद आणि मेकॅनिकली स्टॅबिलाईज्ड्‌ अर्थ वॉल या स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले. तर सुरज विश्वकर्मा व शुभम बारसकर यांनी सिव्हील क्विझ या स्पर्धेत विजेतेपद पटकाविले.
  • विजेत्यांना रोख बावीस हजार रुपयांचे पारितोषिक, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्राचार्य डॉ. ए.एम.फुलंबरकर यांनी अभिनंदन केले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.