Akurdi theft : आकुर्डी येथे पार्क केलेली ऑटो रिक्षा चोरली

एमपीसी न्यूज : आकुर्डी येथे (Akurdi theft) पार्क केलेली ऑटो रिक्षा 20 ऑक्टोबरला चोरी गेल्याची घटना घडली आहे. याबाबत वृषभ वराट (रा. घरकुल चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात भा.द.वि कलम 379 अन्वये निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

20 ऑक्टोबर रोजी श्री सेवा सर्व्हिसेस, बजाज ऑटो शोरूम, फोर्स मोटर्स मटेरियल गेटच्या समोर आकुर्डी रोड येथून फिर्यादी यांची 90,000 किंमतीची बजाज कंपनीची ऑटो रिक्षा (Akurdi theft) कोणत्यातरी अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.