Akurdi : उघड्या दरवाज्याचा फायदा घेत लाख रुपयांच्या दागिने आणि पैशांची चोरी

एमपीसी न्यूज : घराच्या उघड्या दरवाजातून (Akurdi) घुसून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याची घटना काल शनिवारी (22 ऑक्टोबर) घडली. 
याबाबत 25 वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात भा.द.वि कलम 380 अन्वये निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या दत्तवाडी, आकुर्डी येथील राहत्या घराच्या उघड्या दरवाजा वाटे कुणीतरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करून लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या फायद्यासाठी महिलेच्या पर्समधून 1.10 लाख रुपये किंमतीचे 26 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने व पतीच्या पॅन्टच्या खिशातील 10,000 रुपये रोख रक्कम अशी एकूण 1.20 लाख रुपये किंमतीची चोरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.