Akurdi : रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – धावत्या रेल्वेखाली आल्याने 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. 16) सकाळी साडे सातच्या सुमारास आकुर्डी रेल्वेस्थानकाजवळ तरुणाचा मृतदेह मिळाला.

शुक्रवारी सकाळी आकुर्डी रेल्वेस्थानकाजवळ लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या लोहमार्गावर तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती चिंचवड लोहमार्ग पोलिसांना मिळाली. मृताजवळ कोणत्याही स्वरूपाची कागदपत्रे न आढळल्याने ओळख पटू शकली नाही. वय अंदाजे 28 वर्षे, उंची 5 फूट 3 इंच, केस काळे, बांधा मध्यम, दाडी बारीक वाढलेली असे वर्णन आहे. अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती. लोहमार्ग ओलांडत असताना अज्ञात रेल्वेने उडवल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

वरील वर्णनाच्या व्यक्तीबाबत कोणत्याही स्वरूपाची माहिती असल्यास चिंचवड लोहमार्ग पालिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.