Akurdi: अप्पर तहसीलदारांकडून विहिंप, बजरंग दलाच्या सेवाकार्याचा सन्मानपत्र देऊन गौरव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या अपर तहसिलदार गीता गायकवाड यांनी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल पिंपरी-चिंचवड जिल्ह्याचे सन्मानपत्र देऊन कौतुक केले आहे.

कोरोना या भयंकर विषाणु संसर्गामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आले. अशा आपात्कालीन परिस्थितीमध्ये गेली 15 दिवस विहिंप, बजरंग दल, पिंपरी चिंचवड जिल्ह्याच्या वतीने स्थानिक व पर राज्यातील स्थलांतरीत असलेल्या गोर- गरीब, निराधार व गरजु मजुर-बांधवांना जीवनावश्यक ( अन्नछत्र ) वस्तुंचे सढळ हाताने मदत व नियोजनबद्ध वाटप केले. तसेच कार्यालयाशी संपर्कात राहून योगदान देण्याचे कार्य केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून गायकवाड यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल नेहमीच अशा आपत्कालीन परिस्थितीत पिंपरी-चिंचवड शहरच नाही तर देशभरातील जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहून सेवा देण्याचे महान कार्य करीत आहे. त्याचप्रमाणे या राष्ट्रीय आपत्तीला तोंड देण्यासाठी वीर बजरंगी समाजातील सर्वांपर्यंत आपला जीव धोक्यात घालून घरपोच मध्यान भोजन वितरण व सेवाकार्य करत आहेत. या सेवकार्याचे समाजातील सर्वच थरातून कौतुक करण्यात येत आहे, हीच विहिंप, बजरंग दलाच्या सेवकार्याची पोहोच पावती आहे.  नितीन वाटकर – चिंचवड विभाग मंत्री, बजरंग दल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.