Akurdi: मतदान जनजागृती रॅली; श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालयाचा सहभाग

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाअंतार्गत पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आज (मंगळवारी) आकुर्डीतील श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांच्या समवेत मतदान जनजागृतीपर रॅली काढण्यात आली.

यावेळी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तथा नोडल अधिकारी अण्णा बोदडे, विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष एस.एस. तिवारी, नोडल अधिकारी रमेश भोसले, मुख्याध्यापक आर.आर मिश्रा, उपमुख्याध्यापिका कुसूम तिवारी, पर्यवेक्षक कुमावत गार्गी, सुषमा पाटील यांच्यासह शिक्षक मीना म्हस्के, सुरेश पांडे, शंकर अत्रे, सुनीता नेवाळे, सुनीता मुखर्जी, राजेश शुक्ला, पद्मा टकले, उर्मिला अंकुश, आरती जगताप, आरती धाकड, नलिनी सिंह, वंदना पांडे, स्वप्निल चव्हाण्‍, इलिझाबेथ पिंटो, संजय पांडे, अनिता कनवर देवडा, संस्कार प्रतिष्ठानचे डॉ. मोहन गायकवाड स्वीप समन्वयक मुकेश कोळप, तानाजी सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

अण्णा बोदडे यांनी विद्यार्थ्यांना जनजागृतीपर मार्गदर्शन केले. नोडल अधिकारी तथा स्वीप सचिव रमेश भोसले यांनी उपस्थितांना मतदान जनजागृतीपर शपथ दिली. मतदान जनजागृतीपर रॅलीची सुरवात श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालय, आकुर्डी येथून सकाळी वाजता झाली. जुना पुणे-मंबई महामार्गावरून प्रतिभा महाविद्यालय, काळभोरनगर संपुर्ण परीसर, स्टार बाजार मार्गे पुन्हा गोदावरी विद्यालय येथपर्यंत काढण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like