Akurdi : दिव्यांग मतदारांना मतदान प्रकियेची माहिती

एमपीसी न्यूज – मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड कर्णबधिर असोसिएशन, प्रहार अपंग क्रांती संघटना यांच्या सहकार्याने पिंपरी आणि चिंचवड विभानसभा मतदारसंघातील दिव्यांग नागरिकांना व्हीव्हीपॅट मशीनची, मतदान प्रक्रियेची माहिती देण्यात आली. पिंपरी मतदार संघात 494 तर चिंचवड मतदारसंघात 379 दिव्यांग मतदार आहेत.

आकुर्डी येथील डॉ. हेडगेवार भवन येथे आज (गुरुवारी)दिव्यांग मतदारांना माहिती देण्यात आली. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली उंटवाल, मतदान नोंदणी अधिकारी संदीप खोत, पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिपक वजाळे, तहसीलदार राधिका बारटक्के, विजय भोजने, दिव्यांग नोडल अधिकारी संभाजी ऐवले, नायब तहसीलदार संजय कुलकर्णी, पिंपरी-चिंचवड कर्णबधीर असोसिएशनचे परशुराम बसवा, प्रहार अपंग क्रांती संघटनेचे दत्ता भोसले, वाघचौरे, गणेश टिळेकर, भाऊसाहेब कांबळे उपस्थित होते.

मतदान प्रक्रियेत दिव्यांग नागरिकांचा सहज सहभाग हे निवडणुकीचे वैशिष्ट्ये आहे. त्यानुसार दिव्यांगांना दिल्या जाणा-या विशेषसोई सुविधांची संपूर्ण माहिती उंटवाल यांनी दिली. आतापर्यंत विविध कार्यक्रमात सुमारे दोन हजार दिव्यांगांमार्फत मतदान प्रक्रियेची माहिती दिल्याचे संदीप खोत यांनी दिली. दिव्यांगांना वाहतूक सुविधेची आवश्यकता असल्यास संपर्क साधण्याचा आवाहन त्यांनी केला.

यावेळी व्हीव्हीपॅट अर्थात (वोटर व्हेरियबल पेपर ऑडिट ट्रायल मशीनचे) सुभाष जावीर यांनी प्रात्याक्षिक करुन दाखविले. गणेश टिळेकर, भाऊसाहेब कांबळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.