Akurdi : युवा सेनेचा उद्या आकुर्डीत मेळावा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर युवा सेनेच्या पदाधिका-यांचा उद्या (रविवारी) मेळावा (Akurdi) होणार आहे. 200 पदाधिका-यांना नियुक्ती पत्रे देण्यात येणार असल्याची माहिती युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव विश्वजीत बारणे यांनी दिली.

आकुर्डीतील सिझन बँक्वेट हॉलमध्ये रविवारी सकाळी दहा वाजता मेळावा होणार आहे. युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेना सचिव दिनेश म्हात्रे, किरण साळी आदी पदाधिका-यांना मार्गदर्शन करणार आहे. महाराष्ट्रात युवा सेनेचे संघठन मजबूत केले जात आहे. तरुणांना युवा सेनेशी जोडले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम पाहून युवक, युवती युवा सेनेत येत आहेत.

Pune : खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोकळी, भाजप पुणे लोकसभेला कोणाला संधी देणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार लोकोपयोगी निर्णय घेत आहे. शासनाच्या सर्व  (Akurdi) योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविला जाणार आहे. शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी युवा सेनेचे कार्यकर्ते कार्य करत आहेत. लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. विविध योजनांची माहिती पदाधिका-यांना मेळाव्यातून दिली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.