Akurdi : पॅनआर्थोतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज – पॅनआर्थो हॉस्पिटलच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त 1 ते 14 ऑगस्ट या कालावधीत नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

प्राधिकरणातील संभाजी चौकाजवळ असलेले पॅनआर्थो हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असून आर्थोपिडीक सुपर स्पेशालिटी आहे. हॉस्पिटलमध्ये शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. विविध तपासण्या व शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात केल्या जाणार आहेत.

शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी नावनोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी 020-27642764 या क्रमांकावर सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत संपर्क साधावा. हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग, व्यंग, मणक्याचे आजार यासह विविध आजारांवर उपचार केले जातात. लहान मुलांचे आजार, व्यंग, दंतचिकित्सा, केशरोपण, स्त्री रोग चिकित्सा, वंध्यत्व यासाठी स्वतंत्र विभाग असल्याची माहिती पॅनआर्थो हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. मंदार आचार्य यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.